अंशुमन इंडस्ट्रीजला नाविन्यपूर्ण कृषी उपाय विकसित करण्याचा समृद्ध वारसा लाभला आहे. जैव-वर्धक (Bio-enhancers), सूक्ष्मपोषक (Micronutrients), मृदा सुधारक (Soil Conditioners), नायट्रिफिकेशन प्रतिबंधक (Nitrification Inhibitors), फायटोअलेक्झिन एलिसिटर्स (Phytoalexin Elicitors) आणि फवारणी सहायक (Spray Adjuvants) अशा विविध उत्पादनांनी पिकांचे आरोग्य, उत्पादकता आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची क्षमता वाढवून देशभरातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.

अनेक दशकांच्या संशोधन, सातत्यपूर्ण नवकल्पना आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभवाच्या बळावर आम्ही आमचे सर्व ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य साॅइलसोल-ओ या अत्याधुनिक प्रमुख उत्पादनात एकत्रित केले आहे.

  • एकात्मिक सूत्र (Unified Formula) - एकाच उत्पादनात अनेक प्रभावी फायदे.

  • संशोधनाधारित विकास (Research-Driven) - विस्तृत क्षेत्रीय चाचण्या, वैज्ञानिक संशोधन आणि शेतकऱ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे विकसित.

  • सातत्यपूर्ण गुणवत्ता (Consistent Quality) - निरोगी माती, भरघोस उत्पादन आणि विश्वासार्ह कार्यक्षमतेची खात्री.

शाश्वत शेतीची भक्कम पायाभरणी

साॅइलसोल - ओ®

उत्पादन एक, फायदे अनेक

पीक पोषणाची उत्क्रांती

अंशुमन इंडस्ट्रीजमध्ये आम्ही अनेक दशकांच्या संशोधन, अनुभव आणि तांत्रिक कौशल्याचे सार एकत्रित करून आमचे प्रमुख उत्पादन – सॉइलसोल -ओ (SoilSoul O) विकसित केले आहे. आधुनिक शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, विविध उत्पादनांऐवजी एकाच उच्च कार्यक्षम सेंद्रिय उपायाच्या स्वरूपात हे अभिनव उत्पादन सादर करण्यात आले आहे.

सॉइलसोल - ओ (SoilSoul O) हे उच्च दर्जाच्या शेंगदाणा पेंडीपासून (Groundnut Cake) तयार केलेले, पूर्णपणे नैसर्गिक आणि विज्ञानाधारित सेंद्रिय खत आहे. पिकांना सर्वांगीण पोषण पुरविण्याबरोबरच मातीचे आरोग्य सुधारून तिची सुपीकता वाढविण्यासाठी याची विशेष रचना करण्यात आली आहे. कोणत्याही हानिकारक रसायनांपासून मुक्त असलेले हे खत पिकांच्या जोमदार वाढीसाठी मातीमध्ये पिकास अनुकूल बदल करत मातीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांचा पुरेपूर वापर करण्यास मदत करते ज्यामुळे निरोगी माती आणि भरघोस उत्पादनासाठी विश्वासार्ह पर्याय ठरते.

वैशिष्ये आणि फायदे

  • समृद्ध पोषक संरचनाः नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) यांसारख्या आवश्यक प्रमुख अन्नद्रव्यांसह नैसर्गिक तंतू (Natural Fibres) आणि प्रथिनांनी समृद्ध, जे पिकांच्या संतुलित वाढीस पोषक ठरतात.

  • ओलावा व्यवस्थापनः मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवून आवश्यक ओलावा अधिक काळ टिकवून ठेवते, त्यामुळे पिकांना जास्त पाणी परिस्थिती किंवा कोरड्या परिस्थितीतही पाण्याची योग्य उपलब्धता कायम राहण्यास मदत होते.

  • मातीचा सामू (pH) संतुलित ठेवतेः मातीचा सामू (pH) संतुलित राखण्यास मदत करून पिकांच्या निरोगी वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करते.

  • पोषकद्रव्यांचे दीर्घकालीन उपलब्धताः मातीमध्ये दिलेली अन्नद्रव्ये अधिक काळ मुळांच्या कार्यक्षेत्रातच टिकवून ठेवण्यास मदत करते, त्यामुळे अन्नद्रव्यांची पाण्याबरोबर वाहून जाण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांचा कार्यक्षम उपयोग होतो.

  • उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढः मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या आणि कार्यक्षमता वाढवून नैसर्गिकरित्या अधिक सुपीक व सजीव मृदा परिसंस्था निर्माण करते.

  • मातीतील हवेचा संचार सुधारतेः कठीण झालेली माती भुसभुशीत करून हवेचा संचार सुधारते, बियांची उगवण अधिक चांगली होते आणि पिकांमधील कोमेजण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.

शिफारस केलेले प्रमाणः 10 किलो प्रति एकर.

वापरण्याची पद्धतः

अन्नद्रव्यांचे अधिक परिणामकारक शोषण आणि सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी शिफारस केलेल्या NPK खतांसोबत एकत्र मिसळून वापरण्याची शिफारस केली जाते.

तुमच्या मातीची संपूर्ण क्षमता जागृत करा...

सॉइलसोल ओ (SoilSoul O) हे वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे विकसित केलेले प्रगत सेंद्रिय खत आहे. मातीचे भौतिक गुणधर्म आणि पोषणमूल्ये सुधारून तिचे आरोग्य, सुपीकता आणि उत्पादकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी याची विशेष रचना करण्यात आली आहे, ज्यामुळे शाश्वत शेतीला भक्कम आधार मिळतो.

निरोगी आणि सुपीक माती
पिकांची जोमदार वाढ
मातीच्या क्षारतेवर प्रभावी मात
अधिक उत्पादन, उत्तम गुणवत्ता

माती अधिक भुसभुशीत, सुपीक आणि सजीव बनवते, ज्यामुळे मुळांची वाढ जोमदार होते आणि पिकांना आवश्यक पोषकद्रव्यांचे शोषण अधिक प्रभावीपणे करता येते.

मुळांची वाढ अधिक जोमदार करते, प्रकाशसंश्लेषण सुधारते आणि पानांची, फुलांची तसेच फळांची निरोगी वाढ घडवून अधिक सशक्त व उत्पादनक्षम पिके तयार होण्यास मदत करते.

मातीतील क्षारता (EC) आणि सोडियममुळे होणारा ताण कमी करण्यास मदत करते, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही पिकांच्या चांगल्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते.

पोषकद्रव्यांच्या वापर कार्यक्षमतेत वाढ करून पिकांची उत्पादकता आणि गुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा घडवून आणण्यास मदत करते.