अधिकृत उत्पादन माहिती

सॉइलसोल - ओ ची वैधानिक माहिती

संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सर्व वैधानिक माहिती मोबाईल-अनुकूल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पॅकेजिंगवरील QR कोड स्कॅन करून ही माहिती सहज पडताळून पाहता येते.

शासकीय नियमांचे पालन

प्रमाणित उत्पादन तपशील

उत्पादनाचे नावः सॉइलसोल - ओ (SoilSoul O)

उत्पादनाचा प्रकारः सेंद्रिय खत (फक्त शेतीत उपयोगासाठी)

उत्पादनाचे वजनः 10 किलो

उत्पादनाचे वर्णनः उच्च प्रतीच्या शेंगदाणा पेंडेपासून तयार केलेले, पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय खत.

पोषक घटकांची संरचनाः नत्र (N) 0.5%, स्फुरद (P) 0.5%, पालाश (K) 0.5%, C:N प्रमाण <20:1, pH: 6.5 ते 8.5.

शिफारस केलेले प्रमाणः फळबागांमध्येः प्रति एकर १० किलो NPK खतांबरोबर मिसळून वापरावे.

वार्षिक हंगामी पिकासाठी: प्रति एकर २० किलो NPK खतांबरोबर मिसळून वापरावे.

(धान्य पिके, कडधान्य पिके, गळिताची पिके, कंदवर्गिय-हळद, आले, बटाटे, रताळी,नगदी औद्योगिक पिके कापूस व ऊस व सर्व वेल वर्गीय व भाजीपाला पिके)

वापरण्याची पद्धतः अन्नद्रव्यांचे अधिक परिणामकारक शोषण आणि सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी शिफारस केलेल्या NPK

खतांसोबत एकत्र मिसळून वापरण्याची शिफारस केली जाते.

वैशिष्येः संपुर्णतः नैसर्गिक, मातीच्या आर्द्रतेत व सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात वाढ करते, मातीची सर्व प्रकारची अन्नद्रव्ये दीर्घ काळासाठी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते, सामू (pH) संतुलित राखते, मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ करते, क्षारतेचा प्रतिकूल परिणाम कमी करते, माती भुसभूशीत करते त्यामुळे उत्तम बीज अंकुरण होते, रोपांची मर कमी होते.

शासकीय नोंदणीः Organic Manure as per FCO 1985 Sch.-IV, Part-A,

महाराष्ट्र DRC No.: LCFWD2024060185

प्रमाणपत्रेः ISO 9001: 2015 प्रमाणित कंपनी

उत्पादकः अंशुमन इंडस्ट्रिज्

उत्पादन युनिटः गट क्र. 267B/2, पिरंगुट, पुणे 412115

मुख्य कार्यालयः बसंत 135/4, एरंडवणे, पुणे  411004

ग्राहक सेवा क्रमांकः +91 73500 02037

ई - मेल: anshumanindustries@gmail.com